एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:14 PM2021-11-23T14:14:38+5:302021-11-23T14:27:35+5:30

NCB Action in Nanded : सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचे केमिकल ओपीएम पॉपी ​​जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो.त्याच्याव्यतिरिक्त १.४ किलो ओपीएम अफिम जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. 

NCB's major action; Another drug factory busted | एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

Next

काल एक एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. नांदेडच्या कामठा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. तेथून सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचे केमिकल ओपीएम पॉपी ​​जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो.त्याच्याव्यतिरिक्त १.४ किलो ओपीएम अफिम जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. 

२ मशिन्स देखील हस्तगत करण्यात आल्या असून छाप्यादरम्यान एनसीबीने नोट मोजण्याचे मशीन, 1.55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी  तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक मुख्य आरोपी आहे आणि अन्य सहकारी आहेत. आंतरराज्यीय ही टोळी होती असून मुख्य आरोपी मालक असून तो रोड ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचा.ही टोळी राज्याबाहेर देखील ड्रग्ज पुरवत असल्याचा संशय वानखेडे यांनी व्यक्त केला.

रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काही जण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारावर अफू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.  

Web Title: NCB's major action; Another drug factory busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.