NCB ची विमानतळावर मोठी कारवाई; ९ कोटींच्या ड्रग्ससह पकडले परदेशी महिलेला
By पूनम अपराज | Published: February 18, 2021 06:31 PM2021-02-18T18:31:39+5:302021-02-18T18:32:27+5:30
NCB arrested south African women : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एका आंतरराष्ट्रीय तस्कर महिलेबाबत माहिती प्राप्त झाली होती.
एनसीबीच्या मुंबई झोनने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झाडाझडती घेतली असता तिच्याकडे २.९६ किलो हेरॉईन हा ड्रग्ज सापडला आहे. या हेरॉईन ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात नऊ कोटी इतकी किंमत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव खाणीयसिले प्रॉमिसे असे आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एका आंतरराष्ट्रीय तस्कर महिलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पथकाला त्याबाबत माहिती दिली होती. यापासून एनसीबीचे पथक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवून होतं. यावेळी एक संशयित महिला त्या ठिकाणी आली. ही महिला मुंबईहून जोहान्सबर्ग येथे जात होती. या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची झडती घेतली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या बागेत एक चोर कप्पा आढळून आला आणि त्या चोर कप्प्यात २ किलो हेरॉईन सापडलं. तर तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात ९६ किलो हेरॉईन सापडलं.
मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेच्या महिलेला एनसीबीने केली अटक, जवळपास ३ किलो हिरोईन ड्रग्स केला जप्त pic.twitter.com/uhS7GYi27u
— Lokmat (@MiLOKMAT) February 18, 2021
एनसीबीच्या ताब्यात असलेली महिला दक्षिण आफ्रिका देशाची नागरिक आहे. या महिलेला एनसीबी कार्यलयात आणून तिला अटक केली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे.