राष्ट्रवादीचा नगरसेवक वादाच्या भोवऱ्यात; अपहरणाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 08:16 PM2018-12-04T20:16:25+5:302018-12-04T20:18:04+5:30
नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असून माझी लोकप्रियता वाढत असल्याने हे कटकारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.
नवी मुंबई - नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक मुनावर पटेल यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर पटेल यांच्याविरोधात एका रिक्षाचालकाने ही तक्रार दाखल केली होती. पटेल हे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असून माझी लोकप्रियता वाढत असल्याने हे कटकारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे.
२ नोव्हेंबरला खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत रिक्षाचालकाला पटेल यांच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी रिक्षाचालकाला जबर मारहाण केली असल्याचे रिक्षाचालकाने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेत मुनावर पटेल यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली.