आयकर विभागाचा मोठा छापा; तब्बल 3000 कोटींचे घबाड सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 10:22 PM2019-12-02T22:22:02+5:302019-12-02T22:22:32+5:30
250 कोटी रुपये जप्त करण्य़ात आले आहेत.
नवी दिल्ली : एनसीआरच्या एका रिअल इस्टेट ग्रुपवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये मोठे घबाड हाती लागले आहे. सोमवारी सीबीडीटीला याची माहिती देण्यात आली आहे.
सीबीडीटीने याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्या आठवड्यात एका ग्रुपच्या 25 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. हा ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर, मायनिंग आणि रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करते. तर सुत्रांनुसार ओरिएंटल इंडिया ग्रुपवर ही धाड टाकण्यात आल्याचे कळते.
कॅश लेजरमध्ये जवळपास 250 कोटी रुपयांएवढ्य़ा काळ्या पैशांचा शोध लागला आहे. जो जप्त करण्यात आला आहे. या ग्रुपने अनेक मालमत्ता विक्री, खरेदीमध्ये कर भरलेला नाही. याशिवाय जवळपास 3.75 कोटी रुपयांची बेकायदा संपत्ती जप्त केली आहे. तसेच चौकशीत 3000 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. तसेच या रकमेवर करही भरण्याचे कबूल केले आहे. या छाप्यानंतर ग्रुपचे 32 बँक लॉकरही सील करण्यात आले आहेत.