मृत्यूनंतरही 'ती'चा छळ! बलात्कारापासून रक्षणासाठी मुलींच्या कबरीला लावले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 06:14 AM2023-04-30T06:14:37+5:302023-04-30T06:16:11+5:30
पाकिस्तानमध्ये नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे.
पाकिस्तानमध्ये मुलींच्या मृतदेहासोबत बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालक आपल्या मृत मुलींच्या कबरीला टाळे लावून असे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
डेली टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. रक्षणासाठी पालक मुलींच्या कबरीभोवती कुंपण घालून टाळे ठोकत आहेत. पाकिस्तानात याआधीही नेक्रोफिलियाची प्रकरणे नोंदवली गेली असताना, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकांसह काही नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
सन २०११ मध्ये पाकिस्तानात नेक्रोफिलिया प्रकरणाची नोंद झाली होती, जेव्हा ४८ महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर मुहम्मद रिझवान नावाच्या कबरीस्तानच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.