नेपाळी पोलिसांची भारतीय लोकांना मारहाण; तणावानंतर बॉर्डरवर SSB जवान तैनात, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:46 PM2021-05-18T21:46:22+5:302021-05-18T21:56:21+5:30
Nepal police beat indian citizens : वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे.
अररिया - पुन्हा एकदा नेपाळ आणि बिहारच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली आहे. फारबिसगंज उपविभागाच्या जोगबनीजवळ नेपाळ सीमेवर भारतीय आणि नेपाळी पोलिसांमध्ये वादावादी आणि दगडफेक झाली. वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जोगबनीतील इस्लामपूर मशिदी चौकातील खुल्या सीमेवरुन सतत हालचाल सुरू आहेत. यावरूनच सोमवारी जेव्हा सीमावर्ती भागात अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, तेव्हा नेपाळी पोलिस आणि इस्लामपूरमधील लोकांमध्ये गदारोळ झाला आणि नेपाळी पोलिसांनी लाठीमार केला. यावर स्थानिक लोकांनी नेपाळी पोलिसांवर दगडफेक केली.
अजूनही सीमेवर तणाव!
हा मार्ग तस्करांसाठी सोपा आहे आणि या छोट्या मार्गाद्वारे सीमेपलिकडे हालचाल सुरू आहे. नेपाळमधील सीमेवर कडकपणा आणि लॉकडाऊन असूनही लोक सीमा ओलांडत कसे आहेत? यावर प्रश्न उपस्थित होत आहे. ही माहिती मिळताच फरबिसगंजचे डीएसपी रामपुकार सिंह घटनास्थळी गेले आणि आता त्यांनी प्रकरण शांत केले आहे. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.
नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन तरुणाची आत्महत्या https://t.co/megmDINs5A
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021
नेपाळमध्ये लॉकडाउन लागू आहे
असे सांगितले जात आहे की, नेपाळमध्येही संपूर्ण लॉकडाउन आहे, त्यामुळे तेथील सुरक्षा कर्मचारी लोकांना हटकत होते. त्याचवेळी नो मेन्स लँडच्या शेजारी असलेल्या नेपाळच्या साईटवर चहा पिण्यासाठी गेलेल्या काही लोकांचा नेपाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला.
एसएसबीने हे सांगितले
फरबिसगंजचे एसडीओ सुरेंद्रकुमार अलबेला यांनी सांगितले की, काही लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा लोकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळी तळ ठोकून बसलेल्या एसएसबीच्या 56 व्या बटालियनचे एसआय दिनेश प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे आणि कोणालाही नो मेंस लँडमध्ये जाण्यास परवानगी नाही.