काकाच्या अस्थी विसर्जन करून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:59 PM2022-07-18T21:59:30+5:302022-07-18T22:03:23+5:30
Accident Case : लाखांदूर तालुक्यातील तावशी वळणावरील घटना; चूलबंद नदी घाटावरून गावी जाताना दुचाकी झाली स्लीप
लाखांदूर (भंडारा) : काकाच्या अस्थी विसर्जन करून गावी परत जाताना अचानक दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात पुतण्या ठार झाल्याची घटना तालुक्यातील तावशी वळणावर सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
अरविंद महादे शेंडे (४९) रा. भागडी ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. रविवारी गोविंदा शेंडे (७०) रा. रेंगोळा ता. लाखांदूर यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. रेंगोळा येथे अंत्यसंस्कार करुन सोमवारी त्यांच्या अस्थी लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील उत्तरवाहिणी चूलबंद नदीघाटावर विसर्जनासाठी आणल्या होत्या. दुपारच्या सुमारास अस्थी विसर्जन करून अरविंद दुचाकीने (क्रमांक एमएच ३६ ई ४९०६) रेंगोळा या काकाच्या गावी साकोली-वडसा राज्यामार्गावरून जात होता. त्यावेळी तावशी वळणावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी स्लीप होऊन खाली कोसळला. जमिनीवर कोसळला. या घटनेत दुचाकी चालक पुतण्या गंभीर जखमी झाला. मात्र तेथे मदतीसाठी कुणी नसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
काही वेळाने अपघाताची माहिती दिघोरी पोलीसांना झाली. दिघोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे, पोलीस अंमलदार उमेश वलके व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.