राईड मारण्याच्या बहाण्याने नवी कोरी दुचाकीच पळवली; इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात

By प्रशांत माने | Published: December 12, 2022 06:21 PM2022-12-12T18:21:21+5:302022-12-12T18:21:34+5:30

आपला मुलगा चोरी करतो हे समजल्यावर अनिकेतच्या वडीलांनी त्याला घरातून हाकलून दिले आहे.

New bike on the pretext of taking a ride; Recognition on Instagram is expensive in dombivali | राईड मारण्याच्या बहाण्याने नवी कोरी दुचाकीच पळवली; इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात

राईड मारण्याच्या बहाण्याने नवी कोरी दुचाकीच पळवली; इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात

Next

डोंबिवली: मौजमजेसाठी तो नवीन दुचाकी हेरायचा आणि चोरायचा; एवढयावरच तो थांबला नाही तर ज्याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्याचीच नवी कोरी दुचाकी राईड मारण्याच्या बहाण्याने पळवून नेण्याचा धककादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. रामनगर पोलिसांनी कसोशिने केलेल्या तपासात अनिकेत वाडकर (वय २० ) या सराईत चोरटयाला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीत दुचाकी चोरीचे चार गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही पोलिस ठाण्यात विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर परिसरात राहणा-या किशोर सागवेकर या तरूणाची नवी कोरी दुचाकी पुर्वेकडील ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातून इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या अनिकेत वाडकर नामक तरूणाने राईड मारण्याच्या बहाण्याने पळवून नेली होती. ही घटना १ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली होती. नवी कोरी दुचाकी कशी चालते हे पाहण्यासाठी राईड मारण्यासाठी अनिकेत ती घेवून गेला तो परत आलाच नाही. याप्रकरणी सागवेकर याने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या गुन्हयाचा तपास रामनगर पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितिन सांगळे आदिंचे पथक करीत होते. सीसीटिव्ही कॅमेरे आणि तांत्रिक मुद्यांच्या आधारे तपास करून शुक्रवारी कल्याण पश्चिम भागात फिरत असताना पथकाने सापळा रचून अनिकेतला अटक केली. त्याने ठाण्यातील कोपरी, कोलशेत आणि डोंबिवलीतील मानपाडा, ठाकुर्ली परिसरात चार दुचाकी चोरल्याची कबुली चौकशीत दिल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली.

घरातून दिले हाकलून-

आपला मुलगा चोरी करतो हे समजल्यावर अनिकेतच्या वडीलांनी त्याला घरातून हाकलून दिले आहे. घरदार नसल्याने तो असाच फिरत असतो कधी मित्रांकडे सहारा घेत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.

Web Title: New bike on the pretext of taking a ride; Recognition on Instagram is expensive in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.