महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, शेजाऱ्याने कात्रीने कापला तिचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:53 PM2022-07-07T12:53:39+5:302022-07-07T12:53:53+5:30
Delhi Crime News : गांधीनगर भागात 1 जुलैला दुपारी 12 वाजून 38 मिनिटांनी पोलिसांना सूचना मिळाली की, एका घकात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.
Delhi Crime News : दिल्लीच्या गांधीनगर भागातील 22 वर्षीय महिलेच्या हत्येचा खुलासा पोलिसांना केला आहे. पोलिसांनी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका तरूणाला अटक केली आहे. पोलिसांनुसार, शारीरिक संबंध ठेवण्यावरून आरोपीने महिलेचा कात्रीने गळा कापून हत्या केली. पोलीस अधिकारी आर. सत्यसुंदरम यांनी सांगितलं की, आरोपी 25 वर्षीय मान सिंह हा आहे. तो यूपीतील कौशांबी येथे राहणारा आहे.
गांधीनगर भागात 1 जुलैला दुपारी 12 वाजून 38 मिनिटांनी पोलिसांना सूचना मिळाली की, एका घकात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. महिलेचा गळा कापलेला आहे. ही महिला तिचा पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. महिलेच्या पोस्टमार्टममधून समजलं की, तिची हत्या गळा कापल्याने झाली आहे.
पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सीसीटीव्ही फु़टेज चेक केले. पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली. चौकशी दरम्यान 10 तासांचे सीसीटीव्ह फुटेज चेक करण्यात आले. आजूबाजूच्या शेकडो लोकांमधून आरोपीची ओळख पटवणं अवघड होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही भाडेकरूंच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.
तीन दिवसांच्या मेहनतीनंतर आरोपीची ओळख पटली आणि तो महिलेच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका छोट्या रूममध्ये राहतो. तो शेजारच्या कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. चौकशी केल्यानंतर आरोपी मान सिंहने त्याचा गुन्हा कबूल केला.
एक जुलै रोजी तो फॅक्टरीमध्ये गेला नव्हता. रात्री साडे नऊ वाजता तो घरातून निघाला आणि शेजारच्या दुकानातून कात्री घेऊन आला. रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी पीडिता छतावर कपडे वाळत टाकायला गेली होती. जेव्हा ती परत येत होती तेव्हा त्याने तिचा रस्ता अडवला. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेने त्याला रागावलं आणि म्हणाली की, ती हे तिच्या पतीला सांगणार.
यावरून मान सिंह भडकला आणि त्याने महिलेवर कात्रीने हल्ला केला. जेव्हा महिला पायऱ्यांवर पडली तेव्हा त्याने तिचा गळा कापला. यानंतर तो रूममध्ये परत गेला. पाण्याने कात्री आणि हात धुतले. पुरावे मिटवण्यासाठी त्याने त्याचे कपडेही धुतले.
आरोपी मान सिंह कौशांबी यूपीतील राहणारा आहे. तो अविवाहित आहे आणि तीन वर्षाआधी कामासाठी दिल्लीला आला होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं 13-14 वयापासून तो दारू पिऊ लागला होता. तो गेल्या तीन वर्षांपासून त्याच घरात राहत होता.