दुर्दैवी! अडीच कोटींची नवी कोरी गाडी; काही तासांत कारमध्येच जळाला व्यापारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:54 PM2022-01-17T20:54:07+5:302022-01-17T20:54:53+5:30
Tzortizis ने ही महागडी कार केवळ ३ किमी चालवली होती. त्यानंतर तिने पेट घेतला
एथेंस – मोठी स्वप्न पाहून प्रत्येक जण कार खरेदी करतो. जर कारची किंमत कोट्यवधी असेल आणि ती एका अपघातात शिकार झाली आणि कार खरेदी करणाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नसेल. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. मोठ्या आशेने त्या व्यक्तीनं तब्बल अडीच कोटी खर्च करत Ferrari 488 कार खरेदी केली होती. परंतु एका अपघातात ती कार जळून खाक झाली आणि घटनास्थळीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
द सनच्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला. त्याची ओळख ४५ वर्षीय Tzortzis Monoyios म्हणून झाली आहे. तो मोठा व्यवासायिक होता. Tzortizis Monoyios यांची दोन कपड्यांची दुकानं Mykonos Island मध्ये आहेत. हा अपघात ग्रीसच्या राजधानी एथेंसमध्ये झाला असून या अपघात नवी कोरी कार जळून खाक झाली आहे. या अपघातानंतर जे फोटो समोर आले त्यावरुन हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज लावता येईल.
Tzortizis ने ही महागडी कार केवळ ३ किमी चालवली होती. त्यानंतर तिने पेट घेतला. अपघातानंतर Tzortzis चा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या व्यावसायिकाची पत्नीही उपस्थित होती. जेव्हा ही कार जळत होती तेव्हा ग्रीक सिंगर स्टान त्यांच्या मागच्या गाडीत होता. त्यांनी तात्काळ महिलेला अपघातातून वाचवले. कारच्या अपघाताचा व्हिडिओ ग्रीस न्यूज साइटवर प्रसिद्ध झाला आहे. तर अपघातातील मृत Tzortzis Monoyios ग्रीसच्या रियालिटी शो द वॉलमध्ये २००३ मध्ये दिसले होते. तेव्हा तो २३ वर्षीय कॅम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता.