ATM मधील पैसे चोरण्याची चोरांची नवी आयडीया; जेल लावून हजारो रुपये उडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 10:44 AM2022-11-01T10:44:44+5:302022-11-01T10:52:07+5:30

एटीएममधून पैसे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एटीएम फोडीच्याही अनेक घटना तुम्ही अनेक ऐकल्या असतील. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोर वेगवेगळ्या आयडीयांचा वापर करत असतात.

New idea of thieves to steal money from ATM stole thousands of rupees by putting them jail in chennai | ATM मधील पैसे चोरण्याची चोरांची नवी आयडीया; जेल लावून हजारो रुपये उडवले

ATM मधील पैसे चोरण्याची चोरांची नवी आयडीया; जेल लावून हजारो रुपये उडवले

Next

एटीएममधून पैसे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एटीएम फोडीच्याही अनेक घटना तुम्ही अनेक ऐकल्या असतील. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोर वेगवेगळ्या आयडीयांचा वापर करत असतात.चेन्नईतून अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. चेन्नईतील एका एटीएममधून पैसे चोरण्यासाठी जेलचा वापर केल्याचे समोर आले आहे. 

चोरट्यांनी कॅश डिस्पेन्सरच्या समोर एक चिकट सारखा पदार्थ यात त्यांनी जेलने अडकवून काढले. एका महिन्यात या टोळीने २८,४०० रुपये चोरल्याचे समोर आले आहे. चोरट्यांची चोरी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी जेलसारख्या पदार्थचा वापर करुन तिथून पैसे काढले जातात त्या स्लॉटमध्ये ठेवतात. तसेच कोणताही व्यवहार झाला की नोटा डिस्पेन्सरवर अडकतात आणि नंतर टोळी येऊन चोरते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आईने केली दोन मुलांची हत्या; नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

कोणताही व्यवहार न करता पैसे गायब होत असल्याचे बँकेच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यांनी चित्रपटगृहासमोरील किओस्क आणि सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. यावेळी एक टोळी पैसे चोरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या माउंट रोड शाखेचे व्यवस्थापक जी रामकुमार यांच्या तक्रारीवरून चिंताद्रीपेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बदमाशांनी कॅसिनो थिएटरसमोर डॅम रोडवरील बँकेच्या एटीएममधील पैसे चोरले आहेत. एका एटीएममधून ग्राहकाचे पैसे निघत नाहीत,हे लक्षात आल्यानंतर तो ग्राहक निघून गेला.तो ग्राहक गेल्यानंतर ही टोळी येऊन त्या एटीएममध्ये अडकलेले पैसे काढायचे.पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

Web Title: New idea of thieves to steal money from ATM stole thousands of rupees by putting them jail in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.