आजोबा 'राक्षस' असल्याचं सांगत कुऱ्हाडीने केली हत्या, म्हणाला - 'देवानेच मला असं सांगितलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:50 AM2021-10-29T11:50:14+5:302021-10-29T11:50:44+5:30

New Jersey Crime News : १९ ऑक्टोबरला त्यांना एक कॉल आला होता. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तर त्यांना दिसलं की, रक्ताने माखलेला एका वृद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये पडला आहे.

New Jersey : Grandson killed his grandfather with axe claimed god made me do it police arrested- | आजोबा 'राक्षस' असल्याचं सांगत कुऱ्हाडीने केली हत्या, म्हणाला - 'देवानेच मला असं सांगितलं'

आजोबा 'राक्षस' असल्याचं सांगत कुऱ्हाडीने केली हत्या, म्हणाला - 'देवानेच मला असं सांगितलं'

Next

अमेरिकेत (America) एक २१ वर्षीय तरूणाने आपल्या ८१ वर्षीय आजोबाची निर्दयीपणे हत्या (Brutal Mrder) केला आहे. तरूणाने आजोबाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर तरूणाने आपला आजोबा 'राक्षस' असल्याचं म्हणत 'देवाने मला असं करण्यास सांगितलं' असं म्हणाला. पोलिसांनी त्याला हत्येप्रकरणी अटक केली आहे.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील न्यू जर्सीची (New Jersey) आहे. इथे जेसन विकारी (Jason Vicari) नावाच्या तरूणाने गेल्या आठवड्यात आजोबा रोनाल्ड विकारीची हत्या केली होती. त्याला या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जेसन म्हणाला होता की, त्याचे आजोबा 'राक्षस' आहेत. 

पोलिसांनुसार, १९ ऑक्टोबरला त्यांना एक कॉल आला होता. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तर त्यांना दिसलं की, रक्ताने माखलेला एका वृद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये पडला आहे. मृतदेहाजवळच एक कुऱ्हाडही आढळून आली. पोलिसांना हा कॉल स्वत: जेसनच्या वडिलांनीच केला होता. पोलिसांनी जेव्हा याप्रकरणी जेसनची चौकशी केली तर तो कथितपणे म्हणाला की, त्याचे आजोबा 'राक्षस' होते आणि 'देवाने त्याला असं (हत्या) करण्यास सांगितलं'. 

असं सांगण्यात आलं की, जेसनने १९ ऑक्टोबरला हा घातक हल्ला करण्याआधी आपल्या रूममेटला कुऱ्हाडीने धमकावलं होतं. त्यावेळी पोलिसांनी कॅम्पसमधून जेसनचं हत्यार जब्त केलं होतं. पण त्यानंतर जेसनने एक नवीन कुऱ्हाड विकत घेतली आणि आजोबाची हत्या केली. 
 

Web Title: New Jersey : Grandson killed his grandfather with axe claimed god made me do it police arrested-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.