"पप्पा, नवऱ्याला बाईक दिली नाही तर तो मला..."; लग्नानंतर 6 महिन्यातच लेकीसोबत घडलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:09 PM2022-12-06T15:09:12+5:302022-12-06T15:18:29+5:30
हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. देवरिया येथे हुंड्याच्या हव्यासापोटी एका 21 वर्षीय नवविवाहित महिलेची हत्या करून मृतदेह नाल्याजवळील झुडपात फेकून फरार झाल्याची घटना घडली आहे. हुंड्यात बाईक न मिळाल्याने सासरच्या लोकांना राग आल्याचं सांगण्यात येत आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
सोमवारी गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्दगोनिया गावातील नाकटा नाल्याजवळील झुडपात महिलेचा मृतदेह पाहून ग्रामस्थ हादरले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही लोक ट्रॅक्टरने आले आणि मृतदेह इथे टाकून पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली मुलगी अर्चना हिचे लग्न 12 मे 2022 रोजी गौरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बांकी गावातील रहिवासी दुर्गेश चौहान याच्याशी केले होते. मात्र सासरच्या घरी पोहोचल्यानंतर मुलीवर बाईक आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण करून विविध प्रकारे अत्याचार केले. घटनेच्या 25 दिवस अगोदर ते मुलीच्या सासरच्या घरी जाऊन तिची तब्येत विचारण्यासाठी पोहोचला असता, मुलीने तिला झालेला त्रास सांगितला आणि रडू लागली.
हुंडा म्हणून बाईक दिली नाही तर सासरचे लोक जीवे मारतील, असे तिने वडिलांना सांगितले. यानंतर त्यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींना बाईक देण्यास सक्षम नसून आपल्या मुलीचा छळ करू नये, असे समजावून सांगितले. त्यानंतर ते गावी परतला. मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"