बाबो! नववधू पळली चुलत भावासोबत, ५ दिवसांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:29 PM2022-02-11T18:29:03+5:302022-02-11T18:30:44+5:30

Crime News : मुलीच्या वडिलांकडून तिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Newly married woman runs away with cousin, 5 days before she get married | बाबो! नववधू पळली चुलत भावासोबत, ५ दिवसांपूर्वी झाले होते लग्न

बाबो! नववधू पळली चुलत भावासोबत, ५ दिवसांपूर्वी झाले होते लग्न

Next

पाटणा - शेखपुरा येथे नवविवाहित महिला प्रियकरासोबत पळून गेली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे अवघ्या ५ दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. तीही इतर कोणासह नाही तर तिच्या चुलत भावसोबत पळून गेली. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीच्या वडिलांकडून तिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हे प्रकरण  बरबीघा  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामस गावातील आहे. 5 फेब्रुवारी रोजी पाटणातील रामकृष्ण नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलीचे लग्न शेखपुरा येथील  बरबीघा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलाशी झाले होते. अरेंज मॅरेज होते. लग्नानंतर मुलगी माहेरी गेल्यानंतर पार्ट सासरी आली. 4 दिवस ती तिच्या सासरच्या घरी चांगली राहिली. ती तिच्या प्रियकरासोबत काय करणार आहे हेही कोणाला माहीत नव्हते.

प्रेयसीकडून प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, व्हॅलंटाईन वीकमध्ये घडली संतापजनक घटना

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गुरुवार, १० फेब्रुवारी रोजी सासरच्या घरातून बेपत्ता झाली होती. पती आणि सासऱ्यांनी चौकशी केली असता खोलीत सोन्या-चांदीचे दागिने नसल्याचे आढळून आले. यानंतर त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून आपली मुलगी दागिने घेऊन पळून गेल्याचे सांगितले. तात्काळ मुलीच्या घरच्यांनी सासर गाठले. चौकशीअंती मुलीला तिच्या चुलत भावाने लग्नाच्या उद्देशाने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी  बरबीघा  पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयशंकर मिश्रा यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

Web Title: Newly married woman runs away with cousin, 5 days before she get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.