उन्मेष जोशींची दुसऱ्या दिवशीही 8 तास प्रश्नांची सरबत्ती;राजन शिरोडकर यांचीही कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 09:23 PM2019-08-20T21:23:26+5:302019-08-20T21:40:57+5:30

त्यांच्या कंपनीतील तत्कालिन भागीदार व बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांच्याकडे पाच तास चौकशी करण्यात आली.

The next day, Unmesh Joshi's questioning for eight hours; Also enquiry held with rajan shirodkar | उन्मेष जोशींची दुसऱ्या दिवशीही 8 तास प्रश्नांची सरबत्ती;राजन शिरोडकर यांचीही कसून चौकशी

उन्मेष जोशींची दुसऱ्या दिवशीही 8 तास प्रश्नांची सरबत्ती;राजन शिरोडकर यांचीही कसून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देअद्याप ती पुर्ण न झाल्याने बुधवारी पुन्हा दोघांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.ना कार्यालयात बसवून घेवून अधिकाऱ्यांनी व्यवहारांच्या अनुषंगाने माहिती घेतली.

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुन्हा आठ तास चौकशी केली.गृह प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्या कंपनीतील तत्कालिन भागीदार व बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांच्याकडे पाच तास चौकशी करण्यात आली. अद्याप ती पुर्ण न झाल्याने बुधवारी पुन्हा दोघांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
दादर (प) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे(आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालिन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांच्यावर चौकशीचा समेमिरा मागे लावला आहे. राज यांच्याकडे गुरुवारी चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजाविले आहे. तर उन्मेष जोशी यांची सोमवारी आठ तास चौकशी केली होती. त्यांना कार्यालयात बसवून घेवून अधिकाऱ्यांनी व्यवहारांच्या अनुषंगाने माहिती घेतली. सुमारे तीन तासानंतर राजन शिरोडकरही आले. अधिकाºयांनी दोघांना समोरासमोर बसवून विचारणा करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या अनुषंगाने व्यवहारासंबंधी कागदपत्रे, दस्ताऐवजाच्या प्रती घेण्यात आल्याचे समजते. दोघेजण सांयकाळी सातच्या सुमारास दोघे कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी प्रलंबित असल्याने त्यांना बुधवारी पुन्हा कार्यालयात हजर रहाण्यास सांगण्यात आले आहे.

ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता जोशी यांनी कोहिनूर मिल प्रकल्पाच्या अनुषंगाने चौकशीबद्दलची माहिती देत असल्याचे सांगितले. तर शिरोडकर यांनी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे मागितलेली कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात आलो होतो. उद्या पुन्हा आपल्याला बोलाविलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

ईडी कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त
ईडीने मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजाविलेल्या नोटीसामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.गुरुवारी ते दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील कार्यालयात हजर रहाणार असलेतरी चौकशीमुळे मनसे सैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी होण्याच्या शक्यतेने मंगळवारपासून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. गुरूवारी आणखी वाढविला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

 

Web Title: The next day, Unmesh Joshi's questioning for eight hours; Also enquiry held with rajan shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.