एनआयएचे तामिळनाडूत ६ ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईलसह कागदपत्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 07:07 PM2019-10-31T19:07:39+5:302019-10-31T19:11:06+5:30
हिंदू कार्यकर्ते कोईम्बतूर येथे टार्गेटवर होते.
तामिळनाडू - २०१८ च्या इसिस कोईम्बतूर प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूत ६ ठिकाणी छापेमारी केली. आरोपपत्र दाखल केलेले सहा आरोपी आणि त्यांच्या साथीदारांच्या हिंदू कार्यकर्ते कोईम्बतूर येथे टार्गेटवर होते. या आरोपींच्या साथीदारांच्या कोईम्बतूर शहरात राहत्या घरी दोन ठिकाणी एनआयएने छापे टाकले. एक छापा नागापट्टीनम येथील तिरुचिरापल्लीतील सिवगंगा तर दुसरा छापा टूथुकुडी जिल्ह्यात टाकण्यात आला होता.
छाप्यादरम्यान एनआयएने २ लॅपटॉप, ८ मोबाईल्स, ५ सिमकार्ड, १ एसडी कार्ड आणि १४ कागदपत्रे हस्तगत केली आहेत. श्रीलंकेत ‘इस्टर डे’ च्या दिवशी घडलेल्या बॅाम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी सकाळपासून छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.
NIA: NIA is carrying out searches at 6 locations in Tamil Nadu in connection with 2018 ISIS Coimbatore case. It pertains to criminal conspiracy by 6 charge-sheeted accused & their associates, to further the objectives of ISIS by targeting certain Hindu activists in Coimbatore.
— ANI (@ANI) October 31, 2019
NIA: Searches conducted at houses of the associates of the charge-sheeted accused, at 2 locations in Coimbatore City, one location each in Sivaganga, Tiruchirapalli, Nagapattinam and Toothukudi districts. 2 laptops, 8 mobile phones, 5 SIM cards, 1 SD card and 14 documents seized. https://t.co/utkFh8rWb8
— ANI (@ANI) October 31, 2019