Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 06:28 PM2024-11-10T18:28:21+5:302024-11-10T18:28:47+5:30

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

nia disclosed lawrence bishnoi gang shooters truth spreading terror america russia from indian jail | Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. एनआयएच्या तपासात लॉरेन्स गँगच्या शूटर्सबाबत खळबळजनक खुलासे झाले आहेत. जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार टार्गेट लॉक केलं जातं आणि संधी मिळताच त्याला संपवलं जातं असं एनआयएच्या तपासात समोर आलं आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून रक्तरंजित खेळ खेळणारे खतरनाक लोक देशभर पसरले आहेत.

काही महिन्यांपूर्वी एनआयएच्या तपासातून असं समोर आलं होतं की, लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये ७०० हून अधिक शूटर्स आहेत, त्यापैकी ३०० शूटर्स पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि आसपासच्या भागातील आहेत. उर्वरित ४०० शूटर्स मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पसरलेले आहेत. लॉरेन्स गँगंध्ये सामील असलेले सर्व शार्प शूटर फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गँगच्या संपर्कात असल्याचंही तपास यंत्रणेने उघड केलं आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून या शार्प शूटर्सनी दहशत निर्माण केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोईची गँग आधी पंजाबपर्यंत मर्यादित होती. स्वत:ला सलमान खानचा शत्रू म्हणवून घेणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचं नेटवर्क आता अनेक राज्यात पसरलं आहे. कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडसोबत लॉरेन्सने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या गँगशी हातमिळवणी करून मोठी गँग तयार केली. 

लॉरेन्स बिश्नोई गँग आता उत्तर भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडपर्यंत पसरली आहे भारताबाहेर ही गँग आता अमेरिका, पोर्तुगाल, कॅनडा, यूएई आणि रशियामध्ये पसरली आहे. लॉरेन्स बिश्नोई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गँगमधील शूटर्स आणि लोकांशी संपर्क साधतो. जेलमध्ये येणाऱ्या कैद्यांवरही त्याची नजर असते. 

लॉरेन्स गँगने अनेक तरुणांना कॅनडा किंवा इतर देशात जाण्याचं आमिष दाखवून फसवल्याचं तपासात समोर आलं आहे. कॅनडामध्ये लॉरेन्स गँगची पकड मजबूत होत आहे. सातासमुद्रापार आणि देशाच्या विविध भागात पसरलेल्या या गँगची संपूर्ण कमान अजूनही लॉरेन्स बिश्नोईच्या हाती आहे. साबरमती जेलमध्ये असलेल्या लॉरेन्सला गँगबाबतचा प्रत्येक रिपोर्ट मिळत असतो.
 

Web Title: nia disclosed lawrence bishnoi gang shooters truth spreading terror america russia from indian jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.