मदरशावर एनआयएचा छापा, संशयित दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 01:03 PM2022-07-20T13:03:54+5:302022-07-20T13:04:38+5:30
Suspicious Terrorist Arrested : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अतहर परवेझ आणि अरमान मलिक यांना अटक केल्यानंतर चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.
मोतिहारी : अलीकडेच पाटणा येथे पीएफआयच्या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर देशाला त्यांच्या धोकादायक कटाची माहिती प्राप्त झाली आहे. या अटकेनंतरबिहारचे पोलीस आणि तपास संस्था एनआयए सक्रिय झाले आहेत. एनआयए आपल्या बाजूने सतत तपास करत आहे. दरम्यान फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अतहर परवेझ आणि अरमान मलिक यांना अटक केल्यानंतर चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.
यानंतर पोलीस आणि यंत्रणांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मंगळवारी एनआयने मोतिहारीतील ढाका आणि रामगढवामधील पलानवा येथे छापे टाकले होते. यादरम्यान मौलाना असगर अलीला ढाका येथील जामिया मारिया मिशवा मदरशातून अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि आयबीच्या संयुक्त पथकाने मौलानाचा फोटो सोबत आणला होता. मौलानाला ढाका येथील मदरशातून अटक करण्यात आली आहे.
मौलानाच्या सांगण्यावरून जामा मशिदीतून मौलानाचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर एनआयएने त्याचा तपास केला जात आहे. एनआयएने मौलानाबाबत चौकशीसाठी मशीद आणि मदरशातून आणखी चार जणांना ताब्यात घेतले. ज्यांना ढाका पोलीस ठाण्यात चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे. एनआयए आणि आयबीच्या पथकाने मौलानाची सुमारे पाच तास चौकशी केली.
यादरम्यान एनआयएच्या आणखी एका पथकाने पलानवा पोलीस ठाण्याच्या सिसवानिया गड गावात मौलानाच्या घराची झडती घेतली आहे. तेथून एनआयएने काही पुस्तके आणि नोटबुक जप्त केली आहेत. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एनआयएचे पथक मौलानाला सोबत घेऊन पाटण्याला गेले. मौलानाबद्दल सांगितले जात आहे की, त्याने उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंदमधून शिक्षण घेतले. मौलाना सध्या ढाक्याच्या मदरशात शिकवत होते.