Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:55 AM2021-06-17T09:55:46+5:302021-06-17T09:56:33+5:30

Pradeep Sharma : सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

NIA raids house of encounter specialist Pradip Sharma | Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

Next

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.

सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता एनआयएची टीम जेबीनगर मध्ये दाखल झाली. एनआयएची टीम, सीआरपीएफ १० ते १२ गाडया घटनास्थळी आहेत. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांची भगवान भवन या अंधेरीतील इमारतीत ही चौकशी सुरु आहे. अंधेरीतला हा उच्चभ्रू परिसर आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.

Read in English

Web Title: NIA raids house of encounter specialist Pradip Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.