बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास एनआयएकडे, हिजाबच्या वादातून गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:20 PM2022-03-24T21:20:37+5:302022-03-24T21:21:15+5:30
Murder Case : हर्षाने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाबविरोधात एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी भगव्या शालीचे समर्थन केले होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शिवमोगा येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास कर्नाटकपोलिसांकडून काढून स्वतःकडे घेतला आहे. एका अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. हिजाबचा वाद तापल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिवमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर शिवमोगा येथील काही भागात हिंसाचार उसळला होता. खुनाच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली.
चाकू आणि धारदार शस्त्रांनी हर्षाची हत्या करण्यात आली. या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली असून येथे संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. हर्षाने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाबविरोधात एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी भगव्या शालीचे समर्थन केले होते.