कट्टरपंथीयाने पोस्ट करताच NIA ने 'हे' पाऊल उचलले; तामिळनाडू येथील छाप्यात काय सापडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:43 AM2021-05-17T05:43:40+5:302021-05-17T05:44:50+5:30
फेसबुक पेज ‘ठूंगा विझिगल रेंडु इज इन काजीमर स्ट्रीट’वर इकबालने एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात पोस्ट लिहिली होती.
चेन्नई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूच्या मदुराईमध्ये चार ठिकाणी छापे मारले. आयएस व कट्टरपंथी संघटना हिज्ब-उत-तहरीरच्या विचारधारेच्या समर्थनार्थ फेसबुकवर एका कट्टरपंथीयाने पोस्ट केल्यानंतर एनआयएने हे पाऊल उचलले.
एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मदुराई येथील मो. इकबाल याने फेसबुकवर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्याशी संबंधित हे प्रकरण आहे. त्याला मागील वर्षी डिसेंबरमध्ये अटक झाली होती. कट्टरपंथी इकबालने सोशल मीडियावर काही अशा पोस्ट केल्या होत्या ज्यात आयएस व कट्टरपंथी संघटना हिज्ब-उत-तहरीरच्या विचारधारेचे समर्थन केले होते. फेसबुक पेज ‘ठूंगा विझिगल रेंडु इज इन काजीमर स्ट्रीट’वर इकबालने एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात पोस्ट लिहिली होती.
काय सापडले छाप्यात?
एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तामिळनाडूमधील छाप्यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाइल फोन, मेमरी कार्ड, सीम, पेन ड्राइव्हसह १६ डिजिटल उपकरणे व अनेक आक्षेपार्ह पुस्तके, पत्रके, दस्तावेज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढे तपास सुरू करण्यात आला आहे.