अबब... मोबाईलपायी आईने विकले पोटच्या गोळ्याला, निर्दयी आईला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 23:19 IST2018-08-27T21:30:54+5:302018-08-27T23:19:54+5:30
एका अनाथआश्रमाला निर्दयी आईने आपलं दिड महिन्याचं बाळ विकलं. त्या मोबदल्यात तिला ४० हजार रुपये मिळाले.

अबब... मोबाईलपायी आईने विकले पोटच्या गोळ्याला, निर्दयी आईला अटक
नायजेरिया (बेनिन) - नायजेरियामधील एडो राज्यात मोबाईलच्या व्यसनापायी एका जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या दीड महिन्याच्या बाळाला विकल्याची धक्कादायक दुःखद घटना घडली आहे. मिरॅकेल जॉन्सन (वय २३) असे या महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे.
मिरॅकेलला नवीन मोबाईल विकत घ्यायचा होता. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मिरॅकेलचा नवराही नोकरी करत नव्हता. यामुळे मामा जॉय या मित्राच्या मदतीने एका अनाथआश्रमाला निर्दयी आईने आपलं दिड महिन्याचं बाळ विकलं. त्या मोबदल्यात तिला ४० हजार रुपये मिळाले. त्यानंतर तिने महागडा मोबाईल घेतला. याबदद्ल शेजारच्यांना कळताच त्यांनी मिरॅकेलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. यावेळी मिरॅकेलने आपल्याला पश्चाताप झाल्याचं पोलिसांना सांगितले. तसेच जॉयनेच आपल्याला बाळ विकण्याचा सल्ला दिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.