धक्कादायक! नायजेरियामध्ये शाळेवर हल्ला; बंदुकीच्या धाक दाखवत तब्बल 150 मुलांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:42 AM2021-07-06T11:42:34+5:302021-07-06T11:47:04+5:30

Nigeria over 150 students missing after gunmen attack school : काही अज्ञातांनी शाळेवर हल्ला केला. शाळेतील 180 मुलांपैकी जवळपास 25 मुले सापडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

nigeria over 150 students missing after gunmen attack school | धक्कादायक! नायजेरियामध्ये शाळेवर हल्ला; बंदुकीच्या धाक दाखवत तब्बल 150 मुलांचे अपहरण

धक्कादायक! नायजेरियामध्ये शाळेवर हल्ला; बंदुकीच्या धाक दाखवत तब्बल 150 मुलांचे अपहरण

Next

बाउची - नायजेरियातील कडूना राज्यात जवळपास 150 मुलं बेपत्ता आहेत. या मुलांचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी एका मुलीच्या आईने अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञातांनी शाळेवर हल्ला केला. शाळेतील 180 मुलांपैकी जवळपास 25 मुले सापडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस आणि लष्कराकडून या मुलांचा शोध घेतला जात आहे. उत्तर-पश्चिम नायजेरियात डिसेंबर महिन्यापासून असे मुलांचे अपहरण होण्याची ही दहावी घटना आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी शाळेवर गोळीबार करत हल्ला केला. त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश केला. तेथून मुलांना जंगलात घेऊन गेले. एक शिक्षिका आणि 25 मुलांना हल्लेखोरांच्या तावडीतून वाचवण्यात यश मिळाले. अन्य विद्यार्थी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती शाळेचे संस्थापक रेवरेंड जॉन हयाब यांनी 'रॉयटर्स'ला दिली आहे. जवळपास 180 विद्यार्थी शाळेत परीक्षा देणार होते. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शाळा रिकामी केली आहे. या भागात सशस्त्र हल्लेखोर मुलांचे अपहरण करून खंडणी वसूल करतात. डिसेंबरपासून आतापर्यंत जवळपास एक हजार जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यापैकी 150 हून अधिकजण पुन्हा परतले नाहीत. हल्लेखोरांनी एकदा रुग्णालयावरही हल्ला केला होता. बोको हराम आणि इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका या दहशतवादी संघटना अशा प्रकारचे कृत्य करत असे. मात्र, आता स्थानिक टोळीकडूनही असे कृत्य केले जात असल्याचे 'रॉयटर्स'ने म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: nigeria over 150 students missing after gunmen attack school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.