बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:09 PM2020-09-19T12:09:19+5:302020-09-19T12:24:05+5:30
बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करण्यात येणार आहे. बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आता दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे.
अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करण्यात येणार आहे. बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आता दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पण याच दरम्यान बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. लोकांमध्ये यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नायजेरियातही या घटना सातत्याने वाढत होत आहेत. लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
14 वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
बलात्कार करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी महिला संघटनांकडून करण्यात येत होती. 14 वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या महिलेने देखील 14 वर्षाखालील मुलावर बलात्कार केल्यास त्या महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे. लोकांच्या संतापाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केलंं होतं विधान
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये बलात्काराची एक घटना समोर आली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काऱ्यांना जाहीरपणे फाशी द्यावी अथवा नपुंसक करावे असं वक्तव्य केलं आहे. इम्रान खान यांनी महिलांविरोधात लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचे एक राष्ट्रीयपातळीवरील नोंदवही तयार करण्यास सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात असे कृत्य करणार नाही असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट
कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला