नववर्ष स्वागत आणि नाताळ पार्टीसाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियनची ठाण्यात धरपकड

By जितेंद्र कालेकर | Published: December 20, 2023 06:01 PM2023-12-20T18:01:38+5:302023-12-20T18:02:32+5:30

ठाणे पोलिसांकडून यंदाही नववर्षस्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटयार्चे अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविली जात आहे.

Nigerian drug smuggler nabbed in Thane for New Year and Christmas party | नववर्ष स्वागत आणि नाताळ पार्टीसाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियनची ठाण्यात धरपकड

नववर्ष स्वागत आणि नाताळ पार्टीसाठी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियनची ठाण्यात धरपकड

ठाणे: एकीकडे राज्यात सध्या ललीत पाटीलच्या ड्रग्ज तस्करीचे प्रकरण गाजत असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नववर्ष आणि नाताळ पार्टीच्या निमित्ताने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (३३, नालासोपारा, पालघर) याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून १२ लाख ४० हजारांचे ३१ ग्रॅम कोकेनही हस्तगत केले. ठाण्यातील कोपरी पूर्व भागातील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किगंजवळ नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.

त्याचआधारे अपर आयुक्त डॉ. पंजाब उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, हवालदार रोहीदास रावते आणि सुनिल निकम आदींच्या पथकाने १९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेकनाक्याजवळ सापळा रचून नायजेरीयन तस्कर ओकोरी ब्राईट याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे कोकेन, मोबाईल, नायजेरीया देशाचा पासपोर्ट आणि विजा आदी १२ लाख ५१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तो मुळचा नायजेरीयाचा रहिवासी असून त्याने त्याच्या साथीदाराकडून हा अंमली पदार्थ ठाण्यात विक्रीसाठी घेउन आल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
 
२०२२ मध्येही अशीच कारवाई -
२०२२ मध्येही नववर्षस्वागत तसेच नाताळनिमित्त पार्ट्यांच्या अनुषंगाने अमंली पदार्थ विरोधी मोहीम राबवून वागळे इस्टेट, युनिट पाचच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या तस्करीतील तीन नाजेरियनला अटक केली होती. त्यांच्याकडून २७ लाख ६७ हजारांचा ६० ग्रॅम कोकेन आणि ७० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले होते.
 
यंदाही करडी नजर -
ठाणे पोलिसांकडून यंदाही नववर्षस्वागत व नाताळ सुट्टयामधिल पाटयार्चे अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविली जात आहे. अशा पार्ट्यांमध्ये अंमली पर्दाांची विक्री केली जाते का? याची चाचपणी केली जाणार आहे. अशा पाटयार्ंमध्ये अंमली पदार्थ विक्री हाेत असल्यास त्याची माहिती त्वरीत पोलीसांना देण्याचे आवाहनही गुन्हे शाखेने केले आहे.
 

Web Title: Nigerian drug smuggler nabbed in Thane for New Year and Christmas party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.