Crime News: शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरेला न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:38 PM2022-05-19T16:38:51+5:302022-05-19T16:39:27+5:30
Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचें अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून, वेळ आली आहे बारामतीच्या गांधी साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे या तरुणाविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचें अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून, वेळ आली आहे बारामतीच्या गांधी साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे या तरुणाविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला बुधवारी रात्री नोपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. निखिलला गुरुवारी ठाणे न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली आहे. त्यानंतर निखिलला घेऊन पोलीस नाशिकला रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या प्रकरणी नौपाडा पोलिसात फिर्याद दाखल केली होती.
मागील आठवड्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक रिट्विट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पवारांना उद्देशून धमकी देणारी वादग्रस्त मजकूर होता. निखिल भामरे नामक नेटकऱ्याने ही पोस्ट ट्विट केली होती. त्यात वेळ आली आहे बारामतीच्या गांधी साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची असे या पोस्ट मध्ये लिहले होते. या पोस्टचा स्क्रीनशॉट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नौपाडा पोलिसात फिर्याद नोंदवल्याने पोलिसांनी भामरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भामरे याला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी ठाण्यात झालेल्या गुन्ह्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी नाशिक येथून त्याचा ताबा घेतला. त्याला रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायमूर्तीनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन नाशिकला रवाना झाले.