"निक्कीला शोधण्यासाठी वडील साहिलच्या घरी गेले..."; काकांनी सांगितला 'त्या' दिवशी काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:11 PM2023-02-16T16:11:18+5:302023-02-16T16:12:10+5:30
Nikki Yadav : निक्की यादव हिच्या हत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांची मुलगी अचानक त्यांना कशी सोडून गेली, याचा कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
निक्की यादव हिच्या हत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांची मुलगी अचानक त्यांना कशी सोडून गेली, याचा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निक्की यादवच्या हत्येची माहिती कुटुंबीयांना बऱ्याच दिवसांनी मिळाली. निक्कीच्या काकांनी सांगितले की, जेव्हा निक्की बेपत्ता झाली तेव्हा तिचे वडीलही तिला शोधण्यासाठी आरोपी साहिल गहलोतच्या घरी गेले होते. पण तिथेही त्याला आपल्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हती.
आरोपी साहिलने त्यांना आपल्या मुलीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. प्रकरण अतिशय गंभीर आहे. देशाची राजधानी दिल्लीतील या घडामोडीमुळे लहान खेड्यांमधून आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवणारे पालकही चिंतेत आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. एवढेच नाही तर आरोपींना फाशी देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली जात आहे.
निकीचे वडील सुनील निकीच्या अस्थी विसर्जनासाठी गड गंगा येथे गेले आहेत. निक्कीच्या मृत्यूने तिच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. निक्की यादव हत्या प्रकरणानंतर झालेल्या खुलाशांमुळे नातेवाईकही हैराण झाले आहेत. निक्कीचे काका प्रवीण यादव सांगतात की, निक्की कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायची आणि ती हॉस्टेलमध्ये राहायची. अशा परिस्थितीत दिशाभूल करण्यासाठी पोलीस लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या निक्कीची थिअरी स्पष्ट करत आहेत. जे पूर्णपणे चुकीचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
निक्की हत्याकांड! नव्या नवरीसोबत 3 दिवस राहिला, पण...; तिच्या माहेरीही सन्नाटा पसरला
निक्की यादवची हत्या केल्यानंतर साहिल गेहलोतने दुसरं लग्न केलं होतं. साहिलने 9 फेब्रुवारीच्या रात्री निक्कीची हत्या केली आणि 10 फेब्रुवारीला गावात येऊन विधीवत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे. निकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा वाढता दबाव पाहून त्याने चौथ्या दिवशी आपल्या हातून एका मुलीची हत्या झाल्याचे पत्नीला सांगितले. आता पोलीस त्याला पकडतील. म्हणूनच तिने तिच्या घरी जावं असंही त्याने सांगितलं. या प्रकरणाची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी तिला घरी आणलं. साहिलला पोलिसांनी पकडले