नवा ट्विस्ट! "माझी मुलगी साहिलसोबत लिव्ह-इनमध्ये नव्हतीच"; निक्कीच्या वडिलांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:20 AM2023-02-16T10:20:51+5:302023-02-16T10:23:59+5:30
Nikki Yadav : निकीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ही गोष्ट पूर्णपणे नाकारतो आणि हा आमच्या समाजाचा अपमान आहे.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील खेडी खुमार गावात राहणाऱ्या निक्की यादव नावाच्या मुलीचा तिच्या प्रियकराने कारमध्ये मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला. बुधवारी पोस्टमॉर्टमनंतर निक्की यादवचा मृतदेह तिच्या मूळ गावी पोहोचला. निक्कीचे वडील सुनील म्हणाले की, आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांची मुलगी आरोपी साहिलसोबत लिव्ह-इनमध्ये राहत नव्हती, हे पूर्णपणे खोटे आहे, त्यामुळे असं म्हणणं लोकांनी बंद केला पाहिजे असंही सांगितलं.
निकीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ही गोष्ट पूर्णपणे नाकारतो आणि हा आमच्या समाजाचा अपमान आहे. जेव्हा एखाद्या मुलीवर असा गुन्हा केला जातो तेव्हा तिची ओळख उघड होत नाही. आता तर गावाची आणि कुटुंबाची ओळखही समोर आली आहे. तसेच गावातील वकिलाने सांगितले की, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला हे भाग्य आहे, अन्यथा आमच्या मुलीचे श्रद्धासारखे तुकडे केले असते.
बेटी बचाओ बेटी पढाओ हा सरकारचा अजेंडा असल्याचे ते म्हणाले. अजेंडाच बंद झाला आहे. रोज निक्की आणि श्रद्धासारखं कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत घडत आहेत. या हत्याकांडानंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, सध्या सुरू असलेले हे ट्रायल थांबवा.
निक्की यादव खून प्रकरणानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी मीडियाला ट्रायल थांबवण्याचे आवाहन केल्याने गावाची आणि कुटुंबाची बदनामी होत आहे. मात्र, कुटुंबीयांनी हिंदू विधीनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ते सरकारकडे करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"