नऊ वर्षांच्या मुलास सावत्र बापाकडून बेदम मारहाण, आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:43 AM2019-05-08T01:43:41+5:302019-05-08T01:43:54+5:30

नऊ वर्षाच्या आयुष या मुलाने पट्टी तोडली म्हणून सावत्र बाप रवी शाह याने त्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची संतापदायक घटना भार्इंदर पूर्वेत घडली.

A nine-year-old boy has been assaulted by a stepfather, his mother filed a complaint | नऊ वर्षांच्या मुलास सावत्र बापाकडून बेदम मारहाण, आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

नऊ वर्षांच्या मुलास सावत्र बापाकडून बेदम मारहाण, आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

Next

मीरारोड : नऊ वर्षाच्या आयुष या मुलाने पट्टी तोडली म्हणून सावत्र बाप रवी शाह याने त्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची संतापदायक घटना भार्इंदर पूर्वेत घडली. याप्रकरणी मुलाची आई रिंकी हिने दिलेल्या तक्रारीनुसार भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भार्इंदर पूर्वेच्या काशीनगर भागातील ‘हिमांशु’ इमारतीत रवी शाह (३४) हा दुसरी पत्नी रिंकी (२८), तिचा मुलगा आयुष (९) व रवीच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी परी (५) आणि मुलगा साई (३) असे राहतात. रिंकीच्या पतीचे तर रवीच्या पत्नीचे निधन झाले असून, वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. रवी हा मुंबईच्या हिरे बाजारात कामाला आहे.
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कपड्याचे माप घेण्याची लाकडी पट्टी कोणी तोडली म्हणून रवीने मुलांना जाब विचारला. त्यावर आयुषने पट्टी तोडल्याची कबुली दिली. त्याचा राग येऊन रवीने लोखंडी पट्टीने आयुषला बेदम मारायला सुरवात केली. आयुष रडू लागल्याने त्याला वाचवण्याकरिता आई मध्ये पडली. रवीने तिलाही मारहाण केली.

आरोपी रवी हा आयुषचा सावत्र बाप आहे. तो लग्न झाल्यापासून सावत्र मुलगा आयुष याला सतत मारतो. हा प्रकार आपण माहेरच्यांना वेळोवेळी सांगितल्याचे रिंकीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी रिंकीने नवघर पोलीस ठाण्यात पती रवीविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रवीवर गुन्हा दाखल केला.

Web Title: A nine-year-old boy has been assaulted by a stepfather, his mother filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.