नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:26 AM2020-12-08T06:26:35+5:302020-12-08T06:26:57+5:30
Crime News : इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता.
भिवंडी : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एका नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धामणकर नाका परिसरात शनिवारी ५ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याच बाबीचा नराधम आरोपीने गैरफायदा घेत पीडित चिमुरडीस घरात कोणी नसताना आरोपीने पहिल्या माळ्यावर बोलावले. चिमुरडीच्या बालवयाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली असताना शेजारील महिलेले तिची विचारपूस करून फोनद्वारे इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर चिमुरडीच्या आईस दिली. आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर प्रकार समजल्यावर मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इम्रान शेख याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सुरु
न्यायालयाने आरोपीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.
पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली