Nirbhaya Case : विनयनंतर आता दोषी अक्षयने दाखल केली दया याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:57 PM2020-02-01T15:57:26+5:302020-02-01T15:58:45+5:30
Nirbhaya Case : दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात विनय कुमार शर्मानंतर आणखी एक दोषी अक्षय ठाकूर यांनीही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना फाशीपासून सुटका करण्यासाठी दया याचिका पाठविली आहे. याआधी शनिवारी म्हणजेच आज राष्ट्रपतींनी विनय शर्मा याची याचिका फेटाळून लावली असली तरी दोषी विनय देखील मुकेशप्रमाणे राष्ट्रपतींना दया याचिका फेटाळून लावण्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.
Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली
Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली
खालच्या कोर्टासह दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या निर्भयाचे चारही दोषी तिहार जेल नंबर -3 मध्ये आहेत. अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, विनय कुमार शर्मा आणि पवनकुमार गुप्ता या चार दोषींना शनिवारी फाशी देण्यात येणार होती. मात्र, दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
Nirbhaya Case : विनयची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; तिहार जेलची कोर्टात फाशीच्या तारखेसाठी धाव
Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार?
कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पटियाला हाऊस कोर्टाने नियम 836 चा हवाला देत चौघांच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याचा उल्लेख केला आहे. जर अशी तरतूद केली गेली आहे की, जर दया याचिका प्रलंबित राहिल्यास दोषींना फाशी होऊ शकत नाही. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा निर्णय दिला.