Nirbhaya Case : मुकेशची फाशी निश्चित, सर्व कायदेशीर पर्याय संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:25 AM2020-01-29T11:25:26+5:302020-01-29T11:39:06+5:30
राष्ट्रपतींनी दिलेल्या निर्णयात दखल घेण्याची गरज वाटत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी मुकेशची फाशीची शिक्षा आता सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली आहे. मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर शेवटच्या पर्यायाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला आहे. दोषी मुकेश कुमार सिंहाच्या याचिकेवर समीक्षा अथवा कोणताही विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शवला आहे. राष्ट्रपतींनी दिलेल्या निर्णयात दखल घेण्याची गरज वाटत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मुकेशची कायदेशीर पळवाटा काढण्याचे सर्व पर्याय संपले आहेत.
Supreme Court dismisses petition (of 2012 Delhi gangrape convict Mukesh) and says there is no merit in the contention, alleged torture can't be a ground, all documents were placed before the President & he had taken them into consideration. pic.twitter.com/1C9dFrZrlE
— ANI (@ANI) January 29, 2020
मुकेशने १ फेब्रुवारीचा डेथ वॉरंट टाळण्यासाठी आणि राष्ट्रपतींची दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात अपील दाखल केले होते. दिल्लीच्या कोर्टाने चारही दोषींच्या फाशीसाठी १ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषीच्या अपिलावर सर्वोच्च सुनावणी घेण्यास सोमवारी सहमती दर्शवली आणि काल त्यावर सुनावणी सुरु करण्यात आली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी तिहार तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक दावा केला होता.
दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली
निर्भयाच्या दोषींच्या सुरक्षेवर दररोज 50 हजारांचा खर्च