Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 09:35 PM2020-03-17T21:35:19+5:302020-03-17T21:38:09+5:30

Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे.

Nirbhaya Case : this convict’s wife moves family court for divorce pda | Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Next
ठळक मुद्देनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील ४ दोषींपैकी १ दोषी अक्षय ठाकूर औरंगाबादमधील नबीनगर येथील राहणारा आहे. पुनिताचा पती अक्षय ठाकूरला निर्भया बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी असलेल्या अक्षय ठाकूरची पत्नी पुनिता ठाकूरने बिहारच्या कौटुंबिकन्यायालयातघटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.  अक्षय ठाकूरच्या पत्नीने आपला पती निर्दोष असल्याचं सांगत, पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे.

Nirbhaya Case : सात वर्षांनी आठवले, निर्भयावर बलात्कारावेळी राजस्थानात होतो; दोषीचा दावा फेटाळला

Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा



बिहारमधील औरंगाबाद येथे अक्षय ठाकूरची पत्नी, पुनिता ठाकूरचे वकील मुकेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनिता ठाकूर या महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पुनिताचा पती अक्षय ठाकूरला निर्भया बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशात दोषीच्या पत्नीला पुनिताला अक्षय ठाकूरपासून घटस्फोट घेण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं, तिच्या वकीलांनी सांगितलं आहे. घटस्फोट प्रकरणी, कोर्टाने सुनावणीची तारीख १९ मार्च निश्चित केली आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील ४ दोषींपैकी १ दोषी अक्षय ठाकूर औरंगाबादमधील नबीनगर येथील राहणारा आहे. अक्षय ठाकूरला इतर ३ दोषींसह २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे.

Web Title: Nirbhaya Case : this convict’s wife moves family court for divorce pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.