Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:31 PM2020-01-14T14:31:10+5:302020-01-14T14:33:40+5:30
Nirbhaya Case : आज दुपारी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली असून याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती एन.व्ही. रमना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती आर भानुमति आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठावर आज दुपारी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. मात्र, याचिका फेटाळल्याने दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे.
नवी दिल्ली - निर्भयाच्या गुन्हेगारांची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, चारही गुन्हेगारांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता दिली जाणार फाशी https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) January 14, 2020
Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड
न्यायाधीशांच्या दालनात क्युरेटिव्ह याचिकांवर निर्णय घेतला जातो. अक्षय आणि पवन यांच्यासह इतर दोन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता चारही दोषींना फाशी देण्याच्या मृत्यूचे आदेश डेथ वॉरंट कनिष्ठ कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या चौघांना फासावर चढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2012 Delhi gang rape case: Supreme Court dismisses curative petitions of two convicts - Vinay Kumar Sharma and Mukesh Singh. pic.twitter.com/9Nsh1AZMaU
— ANI (@ANI) January 14, 2020