Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:13 AM2020-03-21T00:13:31+5:302020-03-21T00:17:19+5:30

Nirbhaya Case : याक्षणी तो परदेशात या सगळ्यापासून दूर आपल्या परिवारासोबत आहे.

Nirbhaya Case: That nirbhaya friend, the only eyewitness in abroad pda | Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्भयाच्या या मित्राचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. सध्या तो आपल्या पत्नीसमवेत परदेशात स्थायिक झाला आहे त्यांना एक मुलगा देखील आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना आज फाशी झाल्याने तो खूप खूष झाल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली - देशात खळबळ माजविलेल्या आणि बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या कुटुंबीयांनी जितका आनंद झाला तितकाच आनंद घटनेवेळी निर्भयासोबत जो मित्र होता त्याला झाला आहे. या प्रकरणात तो एकमेव प्रत्यक्षदर्शी होता, त्या रात्री त्याच्याबरोबर निर्भया चित्रपट पाहिल्यानंतर परत येत होते. त्यावेळी ही वाईट घटना घडली. या सात वर्षांत निर्भयाच्या मित्रालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. खटल्याच्या वेळी त्याला काही आरोपांचा सामना करावा लागला. पण याक्षणी तो परदेशात या सगळ्यापासून दूर आपल्या परिवारासोबत आहे.

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगार

Nirbhaya Case : 6 नराधमांनी बलात्कार केला होता; चौघांनाच ‘का’ फाशी दिली?
 
तीन वर्षांपूर्वी लग्न झाले

निर्भयाच्या या मित्राचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. सध्या तो आपल्या पत्नीसमवेत परदेशात स्थायिक झाला आहे आणि तो तेथे कार्यरत आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना आज फाशी झाल्याने तो खूप खूष झाल्याचे वृत्त आहे.


हा गोरखपूरमधील तुर्कमानपूरचा रहिवासी आहे. त्याचे वडील गोरखपूरमधील सुप्रसिद्ध वकील आहेत. आपल्या मुलाचे लग्न झाल्याचे त्याने २०१७ मध्ये सांगितले होते. अभियंता असलेला मुलगा सध्या कोठे आहे हे त्याच्या वडिलांनी सांगण्यास नकार दिला.


सात वर्षांपूर्वी १६ डिसेंबरची त्या काळरात्री निर्भयासोबत हा मित्र होता.मित्राने निर्भयाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण नराधमांनी दोघांना बेदम मारहाण  केली होती. नंतर बसमधून त्यांना रस्त्यावर फेकून दिले होते. 

पैसे घेऊन मुलाखत दिल्याचा आरोप होता

काहींनी निर्भयाच्या या मित्रावर पैसे घेऊन आणि प्रसिद्धी माध्यमांना मुलाखती दिल्याचा आरोप केला होता. हे निर्भयाच्या दोषींच्या वकिलानेही कोर्टात मांडले होते. तथापि, त्यामुळे या खटल्यावर फारसा झाला नाही.

Web Title: Nirbhaya Case: That nirbhaya friend, the only eyewitness in abroad pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.