Nirbhaya Case : यापुढे महिलांवर अत्याचार करण्यास नराधम घाबरतील, खा. हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:23 PM2020-03-20T18:23:58+5:302020-03-20T18:25:00+5:30
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर न्याय मिळायला वेळ लागला.
नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच खासदार हेमा मालिनी यांनी देखील निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर न्याय मिळायला वेळ लागला. मात्र, उशीरा का होईना पण चांगली गोष्ट घडली आणि दोषींना फासावर चढवले. देशभरातील सर्व महिलांना आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच या फाशीच्या शिक्षेमुळे यापुढे आता गुन्हेगार महिलांविरोधात गुन्हे करण्यास घाबरतील असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.
Hema Malini, BJP MP: The execution of the convicts in #Nirbhayacase took time but it finally happened which is a good thing. Women across the country are very happy with this development. I believe, from now onwards people will be scared to commit any crime against women. pic.twitter.com/EbVt24yrCn
— ANI (@ANI) March 20, 2020
दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते.