Nirbhaya Case : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:54 PM2020-03-04T13:54:15+5:302020-03-04T13:56:57+5:30
Nirbhaya Case : चौथे डेथ वॉरंट न्यायालय कधी जारी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने २ मार्चला सकाळी फेटाळली. फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात यावे अशी विनंती त्यानं या याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने पवनची याचिका फेटाळली. तसेच ३ मार्चला फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर आता आज पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे चारही दोषींना फासावर चढवणार यावर शिक्कामोर्बत झालं आहे. मात्र चौथे डेथ वॉरंट न्यायालय कधी जारी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
President Ram Nath Kovind rejects the mercy plea of the 2012 Delhi gang-rape case convict, Pawan. pic.twitter.com/ZnJujVh2nt
— ANI (@ANI) March 4, 2020
पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत निर्भया प्रकरणातील चार दोषींच्या ३ मार्चला होणाऱ्या फाशी शिक्षेला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर ताटाकल दोषी पवन गुप्ता यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती या याचिकेवर निर्णय घेईपर्यंत कोर्टाने डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी असा युक्तिवादाचा दोषीचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. यावर तिहार प्रशासनाने कोर्टाला सांगितले होते की, आता न्यायाधीशांची कोणतीही भूमिका नाही, राष्ट्रपती आमच्याकडे अहवाल मागतील, तोपर्यंत दोषींना फाशी देणे थांबवले जाईल. कोर्टाने दोषींच्या वकिलांना फटकारले आणि सांगितले की, तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात.
Nirbhaya Case : आपली संपूर्ण सिस्टम गुन्हेगारांना अभय देते
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2020