Nirbhaya Case : सात वर्षांनी आठवले, निर्भयावर बलात्कारावेळी राजस्थानात होतो; दोषीचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:21 PM2020-03-17T18:21:57+5:302020-03-17T18:24:48+5:30

Nirbhaya Case : मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल केली होती.

Nirbhaya Case: Recall that after seven years, convict was in Rajasthan during rape; The guilty claim was rejected by court pda | Nirbhaya Case : सात वर्षांनी आठवले, निर्भयावर बलात्कारावेळी राजस्थानात होतो; दोषीचा दावा फेटाळला

Nirbhaya Case : सात वर्षांनी आठवले, निर्भयावर बलात्कारावेळी राजस्थानात होतो; दोषीचा दावा फेटाळला

Next
ठळक मुद्दे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशी अवघे दोन तीन दिवस शिल्लक आहेत.निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुकेश कुमार सिंह या दोषीने घटना घडली तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच असा अजब दावा करून मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने आज फेटाळली आहे.


निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला अवघे दोन तीन दिवस शिल्लक आहेत. त्यातच फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अशा प्रकारे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी या दोषींकडून अत्यंत खालच्या थराला जाऊन प्रयत्न होत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह याने आता अजब दावा करायला सुरुवात केली आहे. निर्भयावर लैंगिक अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो, असे सांगत मुकेश सिंह याने आपल्या फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टात केली होती. ही मागणी दिल्ली दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे.

Nirbhaya Case : अखेर दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा

Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी

Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या 'या' दोषीने घेतली पुन्हा कोर्टात धाव 


दोषी मुकेश कुमार सिंह याने आपल्या याचिकेत मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला, असे नमूद केले आहे. मात्र, सरकारी वकिलांनी मुकेशचा हा आरोप दावा फेटाळून लावला आहे. केवळ फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी सोमवारी कोर्टाने मुकेश सिंह याची सर्व कायदेशीर पर्याय वापरू देण्याची याचिका फेटाळून लावली होती. याआधीच्या वकिलांकडून माझी दिशाभूल करण्यात आली. निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Web Title: Nirbhaya Case: Recall that after seven years, convict was in Rajasthan during rape; The guilty claim was rejected by court pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.