Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:38 PM2020-03-20T16:38:31+5:302020-03-20T16:41:31+5:30

Nirbhaya Case : सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली.

Nirbhaya Case: What if convict's dead bodies were not taken over by the family? Government has only one option pda | Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

Next
ठळक मुद्देफाशीआधी चारही दोषींना शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात दाखल झाले. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या कुटुंबीयांनी दोषींचे मृतदेह ताब्यात न घेतल्यास सरकार अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली आहे. रात्रीच्या वेळी मुकेश आणि विनयनं जेवण घेतलं. तर अक्षयनं केवळ चहा घेतला. ते चौघही जण शांत होते. तसंच न्यायालयाकडून काही आदेश आले आहेत का याची माहिती घेत होते, असंही त्यांनी सांगितले. फाशीआधी चारही दोषींना शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. नंतर निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. त्यांतर सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली.


मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात दाखल झाले. दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे ५.३० वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते.

 

Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

Web Title: Nirbhaya Case: What if convict's dead bodies were not taken over by the family? Government has only one option pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.