Nirbhaya Case : दोषींनी अंघोळीला नकार का दिला?; 'त्या' ऐतिहासिक पहाटेचा घटनाक्रम शहारे आणणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:28 PM2020-03-21T23:28:24+5:302020-03-21T23:36:10+5:30

Nirbhaya Case : तिहार कारागृहाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेड आणि सुरक्षा रक्षक, महत्वाचं म्हणजे पवन जल्लाद हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

Nirbhaya Case: Why did the convicts refused for the bath ?; The events of that 'historic' dawn bring a stir pda | Nirbhaya Case : दोषींनी अंघोळीला नकार का दिला?; 'त्या' ऐतिहासिक पहाटेचा घटनाक्रम शहारे आणणारा

Nirbhaya Case : दोषींनी अंघोळीला नकार का दिला?; 'त्या' ऐतिहासिक पहाटेचा घटनाक्रम शहारे आणणारा

Next
ठळक मुद्देजेल नियमावलीनुसार (मॅन्युअल) फाशी देण्यात येणाऱ्या दोषींना त्यांच्या आस्थेनुसार देवाची पूजा करण्यास देण्यात आली .पहाटे ४.४२ वाजता १० मिनिटं पूजा करण्यासाठी चौघांना वेळ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोषींना चहा नाश्ता विचारण्यात आला. 

अखेर सात वर्ष, तीन महिने आणि आठ दिवसांनी तो दिवस उजाडला. संपूर्ण देशभरात खळबळ माजवलेल्या निर्भया सामूहिक आणि हत्या प्रकरणात बहुप्रतीक्षित फाशीची शिक्षा दोषींना देण्यात आली. शुक्रवारी २० मार्च रोजी निर्भयाच्या सहापैकी चार दोषींना अखेर मध्यरात्री कोर्टाच्या सुनावणीनंतर ५. ३० वाजता फाशीवर लटविण्यात आलं.  फाशीच्या शिक्षेसाठी तिहार कारागृहात तब्ब्ल दीड तास म्हणजेच पहाटे ४ वाजल्यापासून तयारी सुरु होती. तिहार कारागृहाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेड आणि सुरक्षा रक्षक, महत्वाचं म्हणजे पवन जल्लाद हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. या ऐतिहासिक पहाटेचे कसे होते एक - एक क्षण ते जाणून घ्या... 


तिहार कारागृहात दीड तासआधी तयारी सुरु

पहाटे ४. २० वाजता  - दिल्लीचे जिल्हा महादंडाधिकारी (दिल्ली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) तिहार जेलला पोचले. 

आणि ४. २० वाजता फाशीची पूर्वतयारी सुरु झाली. फाशीघराचे जीने साफ करण्याचे आले. 

पहाटे ४. ३२ वाजता चारही दोषींना चहा विचारला, नियमानुसार आंघोळ करणार का विचारल?, मात्र दोषी विनय, अक्षय, मुकेश आणि पवनने नकार दिला. 


पहाटे ४.३७ वाजता म्हणजेच पाच मिनिटांनी जेल अधिकाऱ्यांनी फाशी घराची तपासणी केली. जेल नियमावलीनुसार (मॅन्युअल) फाशी देण्यात येणाऱ्या दोषींना त्यांच्या आस्थेनुसार देवाची पूजा करण्यास देण्यात आली .

नंतर पहाटे ४.४२ वाजता १० मिनिटं पूजा करण्यासाठी चौघांना वेळ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोषींना चहा नाश्ता विचारण्यात आला. 

दरम्यान, फाशी घरात तयारी पूर्ण केली जात होती. तेथे १० फुटांचा फाशीचा तख्त उभारण्यात आला होता. तेथे चौघांना उभं केलं जाणार होत. 

पहाटे ४. ५२ चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यात ते फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिहार कारागृहाराबाहेर कडेकोट बंदोबस्त, पॅरामिलिटरी फोर्स तैनात होता. 

पहाटे ४.५९ मिनिटांनी जेल अधीक्षक आपल्या कार्यालयात गेले आणि शेवटचा काही निरोप अथवा आदेश  आला आहे ते त्यांनी पाहिलं. मात्र, कोणताही आदेश नव्हता. ७ वर्ष, ३ महिने आणि आठ दिवस ज्या क्षणाची वाट संपूर्ण देश पाहत होता तो क्षण जवळ येत होता. 

पहाटे ५.०२ मिनिटांनी दोषींना सेलच्या बाहेर काढले, फाशीघर हे  सेलपासून जवळच होते. 

पहाटे ५. ०५ दोषींना फाशीघराजवळ नेण्यात आले, जेल अधिकारी, सुरक्षा रक्षक दोषींसोबत चालत होते. 

पहाटे ५. १४ मिनिटांनी दोषी फाशीघरात पोचले,

पहाटे ५. १७ मिनिटांनी जेल नियमानुसार सर्व दोषींचे हात बांधण्यात आले. 

नंतर ८ मिनिटांनी ५. २५ वाजता फाशीच्या तख्तावर दोषींना पोचविण्यात आले आणि चेहऱ्यावर काळ्या कपडा घातला. वैद्यकीय अधिकारी, जेल अधीक्षक आणि सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते. 

पहाटे ५. २३ मिनिटांनीचार  दोषींचे पाय बांधण्यात आले. मेरठच्या पवन जल्लादने हे सर्व काम केले. 

पहाटे ५.२८ मिनिटांनी दोषींच्या गळ्यात फाशीचा दोरखंड घालण्यात आला. 

आणि पहाटे तो क्षण आलाच ५. ३० वाजता  जेल अधीक्षकाने इशारा दिल्यानंतर पवन जल्लादने लिव्हर (खटका) खेचला आणि फाशी दिली. नराधमांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली. 

Web Title: Nirbhaya Case: Why did the convicts refused for the bath ?; The events of that 'historic' dawn bring a stir pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.