निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : दोषींना लवकरच फासावर चढवता येईल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 08:08 PM2019-12-03T20:08:15+5:302019-12-03T20:14:24+5:30

कारागृह प्रशासनाने जल्लाद उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.

Nirbhaya gang rape case: The culprits can be hanged soon; But ... | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : दोषींना लवकरच फासावर चढवता येईल; पण...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : दोषींना लवकरच फासावर चढवता येईल; पण...

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे फाशी देणारा म्हणजेच जल्लाद उपलब्ध नाही.सूत्रांनी सांगितले की फाशीची तारीख एका महिन्यात जाहीर केली जाऊ शकते.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्काराचे गुन्हेगारांना बचावासाठी आता फारच कमी कायदेशीर उपाय शिल्लक आहेत. त्यांची फाशीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. मात्र, याक्षणी तिहार कारागृह प्रशासनाला एक वेगळी चिंता आहेत. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे फाशी देणारा म्हणजेच जल्लाद उपलब्ध नाही. सूत्रांनी सांगितले की फाशीची तारीख एका महिन्यात जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने जल्लाद उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.

ब्लॅक वॉरंट दिल्यानंतर फाशी दिली जाऊ शकते
तिहार कारागृहाच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, कारागृह फाशीसाठी आवश्यक असलेल्या पर्यायांवर काम करत आहे. फाशी देण्याची तारीख पुढील एका महिन्यात कधीही येऊ शकते. कोर्टाने ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर दोषींना कोणत्याही दिवशी फाशी दिली जाऊ शकते. राष्ट्रपतींनी निर्भयाच्या दोषींची दया याचिका फेटाळल्यास वॉरंट जारी केला जाईल. त्यानंतर फाशीची तारीख निश्चित केली जाईल.

यापूर्वी तिहारमध्ये अफझल गुरूला फाशी देण्यात आली होती
संसदेवरील हल्ल्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी देण्यात आली होती. अफजलला फाशी देण्यापूर्वी तुरूंगाच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. अफझलला फाशी देताना तुरूंगातील कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अफजलला फाशी देताना तुरुंगातील कर्मचाऱ्याला फाशीचा दोरखंड खेचण्याची परवानगी देण्यात आली होती. फाशी देण्यासाठी जल्लाद यांची कमतरता लक्षात घेता तुरुंग अधिकाऱ्यांनी अनौपचारिक चर्चा करताना दुसऱ्या कारागृहातून जल्लाद बोलवणार असल्याचे सांगितले होते. 

तिहार कारागृह प्रशासन कंत्राटी जल्लाद यांची नियुक्ती करू शकते
सुत्रांचे म्हणणे आहे की, सद्य परिस्थिती लक्षात घेता तिहार कारागृहाकडून कोणत्याही फाशीची नियुक्ती होणार नाही असा समज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिहार कारागृह प्रशासन एखाद्याला फाशीसाठी कंत्राटी जल्लाद नियुक्त करेल. तुरूंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आपल्या समाजात बहुतेक वेळा मृत्यूदंड ठोठावला जात नाही. केवळ दुर्मिळात दुर्मिळ शिक्षेसाठी ही शिक्षा देण्यात येते. अशा परिस्थितीत पूर्णवेळ फाशी देण्यासाठी जल्लादची नियुक्ती केली जाऊ शकत नाही.

Web Title: Nirbhaya gang rape case: The culprits can be hanged soon; But ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.