Nirbhaya Case : आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतोय - आशा देवी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 03:35 PM2020-01-07T15:35:10+5:302020-01-07T15:36:19+5:30
Nirbhaya Case : निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली - गेल्या महिन्यात देशात बलात्काऱ्यांना दयेची याचिका करण्याची असलेली तरतूद रद्द करण्याचा विचार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोलून दाखवल्यानंतर निर्भयाच्या आई व वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता काही वेळातच देशभरात खळबळ माजवलेल्या निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. आम्ही चार आरोपींच्या फाशीची शिक्षेवर कोर्ट काय आदेश देणार याची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह म्हणाले होते की, राष्ट्रपती कोविंद यांनी हे स्पष्ट केले होते की, तुमच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही. निर्भया खटल्यातील चारपैकी तीन दोषी तिहार तुरुंगात आणि एक मंडोली तुरुंगात आहे. तिहार तुरूंग प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले, राष्ट्रपतींच्या सूतोवाचानंतर निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी खास दोरखंड आणि फाशी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. बद्रीनाथ सिंह यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले होते की, राष्ट्रपतींच्या भाषणातून हे स्पष्ट झाले की, माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना ते क्षमा करणार नाहीत. दोषींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तिहार प्रशासनाने २९ ऑक्टोबर रोजी सात दिवसांची मुदत दिली होती. ती सहा डिसेंबरला संपली. चारपैकी एक दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली असल्याचे समजते. त्या लोकांनी एवढा भयानक गुन्हा केला आहे की त्याची शिक्षा फक्त फाशीच आहे. त्या दोषींच्या अंतरात्म्यालाही याची जाणीव झाली आहे, असे ते म्हणाले. निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या होत्या की, ‘राष्ट्रपतींनी न्याय दिला असून सर्वोच्च न्यायालयात देखील न्याय मिळेल.’
अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन सुरू; निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्या
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: We are waiting for the court's order on execution of death warrants. The convicts have no appeals pending now. pic.twitter.com/hJSdZSgxzL
— ANI (@ANI) January 7, 2020