नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:19 PM2021-12-29T18:19:50+5:302021-12-29T18:23:04+5:30

Nitesh Rane's anticipatory bail : आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. 

Nitesh Rane's anticipatory bail to be pronounced tomorrow; The argument of both sides is complete | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

Next

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ल्यातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर काल २८ डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. 

सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे.

Web Title: Nitesh Rane's anticipatory bail to be pronounced tomorrow; The argument of both sides is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.