19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:07 PM2023-10-16T22:07:06+5:302023-10-16T22:08:58+5:30

Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: बहुचर्चित निथारी हत्याकांडातील आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि सुरेंद्र कोलीची पुराव्याअभावी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: 19 women-children killed and bodies raped; Release of accused serving 14 years sentence | 19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका

19 महिला-मुलांची हत्या अन् मृतदेहांवर बलात्कार; 14 वर्षांपासून शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची सुटका

Nithari Killings: अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी (16 ऑक्टोबर 2023) नोएडाच्या बहुचर्चित निठारी प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोली याची त्याची निर्दोष मुक्तता केली. यासोबतच सहआरोपी मोनिंदर सिंग पंढेर यालाही उच्च न्यायालयाने दोन खटल्यांत दोषमुक्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोघांनाही फाशीची शिक्षा देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंग पंढेर, यांना ट्रायल कोर्टाने खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. गाझियाबाद सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला पंढेर आणि कोलीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. निकाल देताना खंडपीठाने म्हटले की, फिर्यादी पक्ष आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला. जाणून घ्या काय आहे प्रकरण...

मृतदेहांवर बलात्कार 
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी कोलीची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली. चाचणीदरम्यान त्याने सांगितले की, सर्व मृत्यू गळा दाबल्यामुळे झाले. तसेच, तो मृतदेहांवर बलात्कार आणि नंतर त्याचे तुकडे करायचे.

मानवी मांस खाल्ले
निठारीचे हे खळबळजनक प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा 29 डिसेंबर 2006 रोजी नोएडातील निठारी येथे पंढेर याच्या घरामागील नाल्यात आठ मुलांचे सांगाडे सापडले होते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेंद्र कोलीवर मृतांच्या शरीराचे अवयव खाल्ल्याचा आरोपही आहे.

19 महिला आणि मुलांवर बलात्कार आणि हत्या 
मोनिंदर सिंग पंढेर याच्या घरातून सापडलेल्या मानवी अवशेषांच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. कोली आणि पंढेर यांच्यावर 19 महिला आणि मुलांवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. 13 फेब्रुवारी 2009 रोजी दोन्ही आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

Web Title: Nithari Killings: 2006 Noida Serial Murders: 19 women-children killed and bodies raped; Release of accused serving 14 years sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.