Nithari murder: सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोळीला ठरवले दोषी, १९ मेला शिक्षा सुनावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:44 PM2022-05-17T18:44:03+5:302022-05-17T18:46:51+5:30
Nithari murder : मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालय 19 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणी गाझियाबाद सीबीआय कोर्टात सुरू होते.
गाझियाबाद : निठारी हत्याकांडप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. बडी पायलच्या हत्येप्रकरणी सुरेंद्र कोळीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याचवेळी मोनिंदर सिंग पंढेर हे मोरल ट्रॅफिकिंग कायद्यान्वये दोषी आढळले आहेत. तर सिमरनजीत कौरची भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालय 19 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणी गाझियाबाद सीबीआय कोर्टात सुरू होते.
2017 मध्ये देखील गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पिंकी सरकार हत्या प्रकरणात सुरेंद्र कोळी आणि पंढेर यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने व्यापारी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना निठारी हत्याकांडात दोषी ठरवले होते. सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर पंढेर यांना न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण पिंकी सरकारच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात पंढेर आणि कोळी हे अपहरण, बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळले होते.
सोसायटीत घुसून बाथरूमध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवणाऱ्यास पकडले
काय प्रकरण आहे?
2006 मध्ये जेव्हा निठारी प्रकरण उघडकीस आले तेव्हा देशभरात या क्रूर प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी-5 मधून सांगाडे मिळू लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मानवी हाडांचे काही भाग आणि अशी ४० पाकिटे सापडली, ज्यामध्ये मानवी अवयव भरून नाल्यात फेकण्यात आले होते.
कोण आहे सुरेंद्र कोळी?
सुरेंद्र कोळी हा उत्तराखंडचा रहिवासी असून तो मोनिंदर सिंग पंढेरच्या घरी कामाला होता. पंढेर यांचे कुटुंब 2004 मध्ये पंजाबला गेले तेव्हा घरात फक्त पंढेर आणि कोळी राहत होते. मग याच बंगल्यात दोघांनी केलेल्या खून आणि बलात्कारासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.