सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी CBI चौकशीची नितीश कुमारांनी केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:51 PM2020-08-04T13:51:22+5:302020-08-04T13:54:27+5:30
हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस करत असल्याचं नितीश कुमार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.
जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना बिहार पोलीस देखील तपासात हस्तक्षेप करू लागले. त्यामुळे या प्रकरणाला आता दिवसेंदिवस वेगवगेळी वळण मिळत आहेत. सुशांतच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस pic.twitter.com/9ZmivM0TC6
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2020
अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केला. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप आता बिहार पोलिसांकडून केला जात आहे. त्यातच ईडीने देखील याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही पोलीस यंत्रणाकडून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत सिंग प्रकरणी चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महासंचालक यांची सुशांतच्या वडिलांशी सकाळी बोलणं झालं आहे. त्यांनी सीबीआय चौकशी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस करत असल्याचं नितीश कुमार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.
The DGP spoke to #SushantSinghRajput's father this morning and he gave consent for CBI inquiry. So now, we are recommending CBI probe in the matter: Bihar CM Nitish Kumar to ANI
— ANI (@ANI) August 4, 2020
(file pic) https://t.co/gKpHeYbrk5pic.twitter.com/jnkNXOzY6h
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या