ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला  परमीशन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:37 AM2021-06-19T11:37:11+5:302021-06-19T11:37:22+5:30

Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतीमध्ये गुन्हेगार आता बदल करीत असल्याचे चित्र आहे. 

No call, no OTP, yet money disappears from the bank; Free games, avoid stranger app permissions | ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला  परमीशन टाळा

ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब; फ्री गेम, अनोळखी ॲपला  परमीशन टाळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणुक करीत असल्याचे समाेर आले आहे.  . उल्लेखनीय म्हणजे ना कोल, ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी अँप डाऊनलोड करताना "ऑटो रीड ओटीपी'   परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
यापूर्वी आम्ही अमुक-तमुक बँकेतून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत, अशी कारणे सांगून ग्राहकांना प्रथम कॉल व त्यानंतर ओटीपी विचारून त्यांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली जायची. विश्वास पात्र गोष्ट बोळून ग्राहकांची अन्नी फसवणूक आता कालबाह्य झाल्याने डिजिटल युजात सॉफ्टवेअर अँपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतीमध्ये गुन्हेगार आता बदल करीत असल्याचे चित्र आहे. 

 


अनोळखी ॲप नकोच ! 
n डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ऑप्लिकेशन्स आले आहेत. हेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक 'सर्व टर्मस आणि सर्व कंडिशन्स अप्लाय' करतात. त्यामध्येच 'ऑटो ओटीपी रीड' याला सुद्धा परवागनी देऊत टाकतात.
n अनोळरवी अँप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी आता स्वत: जागरुक होऊन नागरिकांनीच अनोळखी  अँप नको रे बाबा, अशी बाब  म्हणण्यास सुरूवात केली आहे.  


 ॲनी डेस्क , स्क्रीनशेअर सारख्या ॲपमधून सर्वसामान्यांची फसवणुक हाेउ शकते. अनाेळखी ॲपला परवानगी देउ नये. तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.फसवणुक झाल्यास तातडीने पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. अनेकदा माेबाईल हरवल्यास त्याची तक्रार करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी माेबाइल हरवल्यास त्याची पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी.         - विलासकुमार सानप 
सहा. पाेलीस निरीक्षक, सायबर सेल 

Web Title: No call, no OTP, yet money disappears from the bank; Free games, avoid stranger app permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.