ना मित्र, ना बँक बॅलन्स! मृतदेहावर तब्बल 7 पत्नींचा दावा; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:55 AM2019-10-02T09:55:57+5:302019-10-02T09:58:48+5:30
रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली.
हरिद्वार : पोलिसांना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्यावर नातेवाईकांना दावा करावा लागतो. यानंतर पोलिस शहानिशा करून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतात. मात्र, हरिद्वारच्या धर्मनगरीचे पोलिस एका प्रकरणात चक्रावून गेले आहेत. त्यांच्यासोबत असे काही घडले आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे प्रकरण सोडविणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहे.
रविवारी हरिद्वारमध्ये एका 40 वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीच्या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी पहिल्यांदा पाच महिला समोर आल्या. पण पोलिस तेव्हा हैराण झाले जेव्हा या पाचही महिलांनी या व्यक्तीच्या पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पतीच्या आयुष्यात अन्य कोणतीही महिला असल्याची माहिती नसल्याचेही या महिलांनी पोलिसांना सांगितले.
काही तास चाललेल्या या नाट्य आणि वादानंतर कसेतरी समजावून पोलिसांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. पोलिस यानंतर आणखी चक्रावली जेव्हा या पाच महिला पोलिसांत असताना आणखी दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनीही या व्यक्तीच्या पत्नी असल्याचा दावा केला. यामुळे पोलिसांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी आणखी काही दिवस थांबण्याचे ठरविले आहे. कारण आणखी काही महिला पोलिस ठाण्यात येण्याची पोलिसांना भीती आहे.
ज्या मृतदेहावर एवढ्या महिला दावा करण्यासाठी आल्या त्या व्यक्तीचे नाव पवन कुमार आहे. तो ड्रायव्हर होता. रविवारी रात्री त्याने विष प्राशन केले होते. तसेच त्याला जास्त मित्रही नव्हते. त्याच्या खात्यामध्ये झीरो बॅलन्स आहे. त्याने आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या केली. त्याला हॉस्पिटलमध्येही एका महिलेनेच भरती केले होते. ही महिलाही त्याची पत्नी असल्याचे सांगत आहे.