'बाबा, तुमच्या राज्यात कुणीच आनंदी राहू शकत नाही'; फॅशन डिझायनरची ११ व्या मजल्यावरुन उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:59 PM2022-02-15T18:59:18+5:302022-02-15T19:00:34+5:30

आयुषी नोएडा येथील गौरव स्टुडिओमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. समोर आलेल्या माहितीनुसार आयुषीच्या कंपनीनं नुकताच अभिनेत्री करिना कपूरसाठीही ड्रेस डिझाइन केला होता. 

no one happy father your rule young fashion designer jumped 11th floor ghaziabad | 'बाबा, तुमच्या राज्यात कुणीच आनंदी राहू शकत नाही'; फॅशन डिझायनरची ११ व्या मजल्यावरुन उडी

'बाबा, तुमच्या राज्यात कुणीच आनंदी राहू शकत नाही'; फॅशन डिझायनरची ११ व्या मजल्यावरुन उडी

Next

गाझियाबाद-

गाझियाबादमधील राजगर एक्स्टेंशनमध्ये एका फॅशन डिझायनरनं इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आयुषी दीक्षित असं असून घटना घडली त्यावेळी फ्लॅटमध्ये तिची आई देखील होती. आयुषीजवळ पोलिसांना एक सुसाइट नोट देखील सापडली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 

नंद्रगाम परिसरातील राजनगर एक्स्टेंशनमधील सृष्टी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. मेरठच्या कंकर खेडाचे रहिवासी असलेले सतीष दीक्षित यांचं कुटुंब सृष्टी सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ११०१ मध्ये वास्तव्याला आहे. सतीष दीक्षित यांची मेरठ येथे स्वत:ची फॅक्ट्री आहे. तर त्यांची मुलगी आयुषी नोएडा येथील गौरव स्टुडिओमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. समोर आलेल्या माहितीनुसार आयुषीच्या कंपनीनं नुकताच अभिनेत्री करिना कपूरसाठीही ड्रेस डिझाइन केला होता. 

२५ वर्षीय आयुषी सोमवारी रात्री ८ वाजच्या सुमारास तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये आली आणि तिथं खुर्चीवर उभं राहून बाल्कनीच्या रेलिंगवर चढून इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. जोरात आवाज झाल्यानं इमारतीचा वॉचमन घटनास्थळावर धावत पोहोचला आणि आयुषीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर त्यांना आरडाओरडा करत सर्वांना बोलावला. आयुषीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार करण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

सुसाईड नोटमध्ये काय सापडलं?
पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात आयुषीनं नोकरीच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. यासोबतच तिनं जे लक्ष्य गाठायचं होतं त्यात अपयश येत असल्याचंही म्हटलं आहे. तसंच तिनं आपल्या वडीलांचाही उल्लेख केला आहे. "बाबा तुमच्या राज्यात कुणी कधीच आनंदी राहू शकत नाही", असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं असून पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केली आहे.  

Web Title: no one happy father your rule young fashion designer jumped 11th floor ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.