संजय पांडे यांना दिलासा नाही; विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:46 PM2022-08-04T17:46:04+5:302022-08-04T17:46:43+5:30
Sanjay Pandey : विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय पांडे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय बुधवारी राजधानीतील एका ट्रायल कोर्टाने राखून ठेवला होता. त्यावर आज दिल्ली विशेष न्यायालयाने निर्णय देत संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी आरोपी पांडे आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.
जामीन याचिकेवर ईडीने काय म्हटले?
आजच्या सुनावणीदरम्यान, ईडीने पांडेच्या जामीन अर्जाला विरोध केला की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे आणि जर दिलासा दिला गेला तर आरोपी तपासावर प्रभाव टाकू शकतात आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. पांडेला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने यापूर्वी 14 जुलै रोजी एनएसईच्या माजी महासंचालक चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती.
न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली
कोठडीतील चौकशीचा कालावधी संपल्यानंतर ईडीने मंगळवारी पांडेला न्यायालयात हजर केले होते आणि यापुढे आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. यानंतर न्यायालयाने पांडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.